विधी मंडळाचे 5 व 6 जुलै रोजी अधिवेशन


मुंबई : विधी मंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनाच्या प्रांगणात झाली. बैठकीत पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजासंदर्भातील चर्चा करण्यात आली. कोरोनाचा धोका लक्षात घेता मुंबईत विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 व 6 जुलै रोजी घेण्याचा निर्णय झाला. मंत्री व राज्यमंत्री यांच्यासोबत एकाच अधिकार्‍याला प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच अधिवेशन कालावधीत खासगी व्यक्तींना विधानभवनात प्रवेश देण्यात येणार नाही. याचबरोबर मंत्रालय अधिकारी व कर्मचारी यांनादेखील मर्यादित स्वरुपात प्रवेश देण्यात येणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !