लाखोंची रोकड असलेले एटीएम चोरट्यांनी लांबवले
चाळीसगाव : लाखो रुपयांची रोकड असलेले एटीएमच चोरट्यांनी लांबवल्याची घटना चाळीसगाव शहरात घडल्याने खळबळ उडाली. सूत्रांच्या माहितीनुसार, खरजई नाक्याजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम असून बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी हे मशीन लांबवले. त्यात सुमारे 17 लाखांची रोकड असल्याचे समजते. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गंवाडे, निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, सहाय्यक निरीक्षक विशाल टंकले यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी धाव घेतली.


