उपराजधानी पुन्हा हादरली : अनैतिक संबंधातून एकाची हत्या


नागपूर : मित्राच्या पत्नीशी निर्माण झालेल्या अनैतिक संबंधातून एकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूरात घडली. विशेष म्हणजे नदीच्या काठावर जमलेल्या गर्दीतील काहींनी मोबाईलमध्ये या लाइव्ह मर्डरची क्लीप तयार करून ती व्हायरल केल्यानी खळबळ उडाली. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही घटना घडली. योगेश आनंद डोंगरे ऊर्फ धोंगडे (32) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सुनील ऊर्फ गोलू अरुण धोटे (26), हर्ष उमाळे (33) आणि कांचा ऊर्फ ऋषिकेश धुर्वे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नदीपात्रात केली हत्या
मृत योगेशशे आरोपी सुनीलच्या घरी जाणे-येणे वाढल्यानंतर त्याचे सुनीलच्या पत्नीशी संबंध जुळले व ते लक्षात आल्यानंतर आरोपी सुनीलने त्याला समजही दिली मात्र, योगेश ऐकायला तयार नव्हता. शनिवारी सुनील धोटेच्या आईने योगेशला सुनेसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर तिने मुलास माहिती दिल्यानंतर त्यांनी योगेशचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आरोपी सुनील आणि साथीदार योगेशच्या घरी पोहोचले. त्यांनी योगेशला मारहाण केली. जीव धोक्यात असल्याचे पाहून कशीबशी सुटका करून घेत योगेशने पळून जाण्यासाठी नाग नदीच्या पाण्यात उडी मात्र नदीत चिखल व गाळ असल्याने तो अडकला व त्याचवेळी सुनीलने त्याच्या मागेच पाण्यात उडी घेत त्याच्यावर शस्त्राचे सपासप वार करीत त्याची हत्या केली. पाहणार्‍यांनी योगेशच्या मदतीला धावण्याऐवजी मोठ्या संख्येतील बघ्यांनी लाइव्ह मर्डरची मोबाइलमध्ये क्लीप बनविण्यालाच प्राधान्य दिले. माहिती कळताच कोतवाली पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी योगेशला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.दरम्यान, युनिट तीनच्या पथकाने या प्रकरणात आरोपी सुनील धोटे आणि हर्ष उमाळेला अटक केली. कांचाचा शोध घेतला जात आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !