भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून ? : अॅड.रोहिणी खडसेंची भाजपावर टिका
मुक्ताईनगर : सध्या ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपने जिल्हा परीषदेच्या पोटनिवडणुकांमध्ये ओबीसीच उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले असतानाच ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात शनिवार, 26 जून रोजी आंदोलन देखील करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे यांनी ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले आहे. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. .. आता गळा काढण्यात अर्थ नाही, असे त्यांनी ट्टिटमध्ये नमूद केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदाच थेट फडणवीस यांना टार्गेट केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.
भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. .. आता गळा काढण्यात अर्थ नाही.
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 24, 2021



एकाच कुटुंबातील दोन भूमिका समोर
अॅड.रोहिणी खडसे यांनी फडणवीस यांना टार्गेट केले असतांना बुधवारी खासदार रक्षा खडसे यांनी ओबीसी आरक्षणासाठी भाजप आंदोलन करणार असून आपण यात सहभागी होणार असल्याची घोषणा केल्यानंतर ओबीसी आरक्षणावरून खडसे कुटुंबातील दोन भूमिका समोर आल्या आहेत.

