प्रवाशांना दिलासा : आठ रेल्वे गाड्यांना मुदतवाढ
भुसावळ : रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आठ विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली. 05017 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडी तसेच 05018 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 1 जुलैपासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येणार आहे. 05102 लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा विशेष गाडी 8 जुलैपासून व 05101 छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 6 जुलैपासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल. 02598 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-गोरखपूर विशेष गाडी 7 जुलैपासून व 02597 गोरखपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष अतिजलद गाडी 6 जुलैपासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल. 02741 वास्को दी गामा-पटना विशेष अतिजलद गाडी 30 जूनपासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल तसेच 02742 पटना-वास्को दी गामा विशेष गाडी 3 जुलैदरम्यान चालविण्यात येईल तसेच 07323 हुबळी-वाराणसी विशेष अतिजलद गाडी 25 जुनपासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल व 07324 वाराणसी-हुबळी विशेष अतिजलद गाडी 27 जुनपासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल तसेच 06229 मैसूर-वाराणसी विशेष अतिजलद गाडी 29 जुनपासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल तसेच 06230 वाराणसी-मैसूर विशेष गाडी 1 जुलैपासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल व 06502 यशवंतपूर-अहमदबाद विशेष अतिजलद 27 जुनपासून व 06501 अहमदबाद-यशवंतपूर विशेष अतिजलद गाडी 29 जुनपासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.
पुण्याहून सुटणार्या या गाड्यांना मुदतवाढ
05030 पुणे-गोरखपूर विशेष गाडी 3 जुलैपासून व 05029 गोरखपूर -पुणे विशेष गाडी 1 जुलैपासून पुढील सुचना मिळेपर्यंत चालविण्यात येईल.



