मुंबई-गोरखपूर साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदतवाढ


भुसावळ : लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष आणि लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष वातानुकूलित गाड्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्या धावणार
05401 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 30 जून व 7 जुलै रोजी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 05402 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर दरम्यान विशेष गाडी 2 व 9 जुलै रोजी चालविण्यात येणार आहे. 01355 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष वातानुकूलित गाडी 29 जुन, 6 जुलै व 13 जुलै चालवण्यात येणार आहे. 01356 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष वातानुकूलित गाडी 1, 8 व 15 जुलै रोजी चालवण्यात येणार आहे. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !