सचिन वाझेंच्या जवाबामुळे माजी गृहमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अडचणीत
मुंबई : वरीष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी केलेल्या शंभर कोटींच्या आरोपांचा तपास करत असलेल्या ई.डी.ने दिवसभर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालये आणि घरांवर धाडी टाकल्या होत्या. तसेच त्यांच्या स्वीय सहाय्यक आणि स्वीय सचिवांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर ई.डी.ने दोघांनाही अटक केल्योन खळबळ उडाली आहे.
दोघांची कोठडीत रवानगी
ई.डी.च्या अटकेत असलेले अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांना मे.न्यायालयाने 1 जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.
परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपांची ई.डी.कडून चौकशी सुरू असून,
ई.डी. अधिकार्यांनी या प्रकरणी सकाळपासून पाच ठिकाणी छापेमारी केली.



