ताजमध्ये बंदूकधारी इसम घुसल्याच्या अफवेने उडाली खळबळ
मुंबई : ताज हॉटेलमध्ये दोन मास्कधारी व्यक्ती बंदुकीसह घुसले असल्याच्या फोनने दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. फोननंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि घटनास्थळाची पाहणी करण्यास पोहोचल्या. मुंबई पोलिसांचे बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून घटनास्थळाची पाहणी केली गेली. त्यानंतर ही अफवा असल्याचं समोर आले असून एका 14 वर्षीय मुलांने हा फोन केल्याचं समोर आलं आहे. चौकशीअंती हा फोन कॉल खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी 14 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे.


