नगर अर्बन बँकेत अपहार : तिघा डॉक्टरांना अटक
अहमदनगर : पिंपरी-चिंचवडच्या आर्थिक गुन्हे शाखेने नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेतील 22 कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणी डॉ.भास्कर सिनारे, डॉ.रवींद्र कवडे व डॉ.विनोद श्रीखंडे यांना अटक केल्याने खळबळ उडाली. न्यायालयाने संशयीत आरोपी डॉक्टरांना 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बँकेची फसवणूक करून घेतलेल्या कर्जाच्या पैशांतील सहा कोटी चार लाख रुपये या तिघा डॉक्टरांच्या खात्यावर वर्ग झाल्याचे तपासात समोर आले.


