आता चौकशीची गरज नाही ; ‘ईडी’चे शरद पवारांना पत्र
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘ईडी’कडून शरद पवार यांना एक ईमेल पाठवण्यात आला आहे. सध्या कोणत्याही चौकशीची गरज नसल्याचे या मेलद्वारे पाठवलेल्या पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच भविष्यातही चौकशीची गरज नसल्याचे ‘ईडी’ने म्हटल्याचे समोर आले आहे. गुरुवारी शरद पवार यांच्या वकीलाने केलेल्या ईमेलवर ‘ईडी’ने प्रतिक्रिया दिली. शरद पवारांच्या चौकशीची गरज नसल्याचे या पत्राद्वारे सांगण्यात आले आहे. तसेच भविष्यातही कदाचित शरद पवारांच्या चौकशीची गरज भासणार नाही. गरज भासल्यास बोलवले जाईल, असेही ‘ईडी’ने या पत्रातून स्पष्ट केले आहे. शरद पवारांनी ‘ईडी’ला दिलेल्या पत्राला हे उत्तर मिळाले आहे.