बीएचआर घोटाळ्यातील मुख्य आरोपी जितेंद्र कंडारे अखेर जाळ्यात
जळगाव : राज्यभरात गाजलेल्या बीएचआर पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य संशयीत तथा अवसायक जितेंद्र कंडारेच्या इंदौरमधून पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा मुसक्या आवळल्याने घोटाळ्यातील आरोपींच्या घोटात मोठी खळबळ उडाली. आरोपीच्या अटकेमुळे आता बीएचआर घोटाळ्यातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा उलगडा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मुख्य अवसायक जितेंद्र कंडारे हा गेल्या सात महिन्यांपासून पसार असल्याने त्याचा राज्यभरात शोध सुरू होता मात्र आरोपी दरवेळा गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. आरोपी इंदौरमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाळत ठेवून असलेल्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीला अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला तपासाधिकारी तथा आयुक्त भाग्यश्री नवटके यांनी दुजोरा दिला.


