भूमी अभिलेखचा लाचखोर मुख्यालय सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात


दोन हजारांची लाच भोवली : नाशिक एसीबीची कारवाई

नाशिक : तक्रारदाराच्या शेत जमिनीची मोजणी करण्याच्या कामात चलन देवून चलनाची माहिती ऑनलाईन भरून तत्काह नोटिसा देत मदत करण्यासाठी दोन हजारांची लाच मागणार्‍या सटाणा उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक सुनील रामचंद्र मोरे (45) यांना नाशिक एसीबीच्या पथकाने मंगळवारी कार्यालयातच सायंकाळी लाच स्वीकारताच रंगेहाथ अटक केली.

कार्यालयातच स्वीकारली लाच
सटाणा येथील 29 वर्षीय तक्रारदाराचे काम करून देण्यासाठी मंगळवारी सुनील मोरे यांनी दोन हजारांची लाच मागितली मात्र तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे लाच द्यावयाची नसल्याने तक्रार नोंदवली. लाचेची पडताळणी करण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. सायंकाळी आरोपीने तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार व्ही.पाटील, निरीक्षक साधना बेलगावकर, नाईक एकनाथ बाविस्कर, नाईक प्रकाश महाजन आदींनी हा सापळा यशस्वी केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !