बीएचआर घोटाळा : प्रशासक जितेंद्र कंडारेला कोठडी
पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळातील मुख्य आरोपी जितेंद्र कंडारे यास अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. प्रशासक जितेंद्र कंडारेला इंदूर येथे अटक करण्यात आल्यानंतर बुधवारी पुणे विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आरोपीने जळगाव येथील बीएचआर पतसंस्थेच्या मालमत्ता कमी दराने हितचिंतकांना विकून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. तब्बल 1,200 कोटींचा हा घोटाळा आहे. या घोटाळ्यात मध्ये प्रशासक जितेंद्र कंडारे आणि सुनील झंवर हे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे. सुनील झंवर अजूनही पसार आहे. मात्र जितेंद्र कंडारे पोलिसांच्या ताब्यात आल्याने सुनील झंवर देखील लवकरच सापडेल, असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला.


