चंद्रशेखर कापडे यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव
अमरावतीत खासदार नवनीत राणा यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान
भुसावळ – जळगाव जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष चंद्रशेखर कडू कापडे यांना अमरावती जिल्हा कुंभार समितीकडून समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याहस्ते कापडे यांचा सन्मान करण्यात आला. प्रसंगी श्रीराम कोल्हे, पंजाबराव काकडे, नांदूरकर, कुंभार, सखारामजी मोरे, आत्माराम कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.