मोदी सरकारच्या मंत्री मंडळात महाराष्ट्रातील चौघांना संधी


नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ. भागवत कराड आणि डॉ. भारती पवार या चार महाराष्ट्रातील शिलेदारांना संधी मिळाली आहे. नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी तर रावसाहेब दानवे यांना आता रेल्वे राज्य मंत्रीपद देण्यात आले तसेच कपिल पाटील यांना पंचायतराज राज्यमंत्री पदाची जबाबदारी व डॉ.भागवत कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. याचबरोबर डॉ. भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

हे वाचले का : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची प्रकृती खालावली : मुंबईतील पत्रकार परीषद रद्द





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !