भुसावळातील प्रभाग 12 चा चेहरा-मोहरा बदलणार : राजू सूर्यवंशी
भुसावळ : भुसावळातील प्रभाग 12 चा विकासकामांच्या माध्यमातून चेहरा-मोहरा लवकरच बदलणार असल्याची माहिती रीपाइंचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी व नगरसेविका पूजा सूर्यवंशी यांनी बुधवारी दुपारी
पत्रकार परिषदेत दिली. सूर्यवंशी दाम्पत्य म्हणाले की, प्रभागाच्या विकासकामांसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात आला असून या विकासकामांना लवकरच सुरुवात होणार आहे.
या कामांना लवकरच होणार सुरूवात
संभाजी नगरातील रस्ता काँक्रिटीकरण, प्रल्हाद नगर व गुजर कॉलनी भागातील रस्ता काँक्रिटीकरण, रामायण नगर भागात गटारी बनवणे व रस्ता काँक्रिटीकरण, सुंदर नगरात ओपन स्पेसला संरक्षण भिंत व बागबगीचा तयार करणे आदी कामे करण्यात येतील. वारंवार पाठपुरावा करून ही कामे मंजूर करण्यात आली असून त्याची वर्कऑर्डरही निघाली असल्याचे नगरसेविका पुजा सूर्यवंशी म्हणाल्या. नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या सहकार्याने हा निधी मंजूर झाला असून यामुळे प्रभागातील तब्बल 50 वर्षांपासून रखडलेल्या कामांना गती दिली जाणार आहे.



