शिवसेना नेते संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला

मुंबई : शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवारांवर गुन्हा दाखल केल्यानंतर शिवसेनेने शरद पवारांना पाठिंबा दिल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यातच शनिवार शिवसेनेचे नेते संजय राऊत शरद पवार यांच्या घरी गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, एकीकडे युतीचे गुर्हाळ सुरू आहे. भाजपाने दोन दिवसांपूर्वी दिल्लीत मॅरेथॉन बैठक घेत शिवसेनेसमोर 144-126 असा फॉर्म्युला ठेवला आहे तसेच काही जागांची अदलाबदलही ठेवली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत युती होणार की तुटणार ? यावर निर्णय यायचा आहे.
