सांत्रागाची-हापादरम्यान विशेष रेल्वे गाडी


भुसावळ : आगामी दीवाळी व दुर्गोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे गाड्यांना प्रवशांची असलेली गर्दी पाहता सांत्रागाची-हापादरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. अप 82034 सांत्रागाची- हापा दरम्यान शुक्रवार, 4 रोजी 9.5 वाजता सुटून रविवारी 4.35 वाजता हापाला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात डाऊन 82033 हापा-सांत्रागाची गाडी सोमवार, 7 रोजी 10.40 वाजता सुटून बुधवारी पहाटे 5.45 वाजता सांत्रागाची पोहोचणार आहे. दोन्ही गाड्या प्रत्येकी तीन फेर्‍या करणार आहेत. या गाडीला खरगपूर, टाटानगर, चक्रधरपूर, राउए केला, झारसुगडा, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जलगाव, अमळनेर, नंदुरबार, सुरत, भरूच, बडोदा, अहमदाबाद , सुनेंर्द्रनगर, वाकानेर, राजकोट येथे थांबा देण्यात आला आहे.


कॉपी करू नका.