पावसाने हाहाःकार : तळईत दरड कोसळून 35 नागरीक ठार


रायगड : कोकणातील डोंगर कपारीत वसलेल्या अनेक गावांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना असून रायगडमधील तळई गावात दरड कोसळल्याने गावातील सुमारे 35 घरे गाडली गेल्याने सुमारे 35 नागरीक ठार झाल्याची भीती आहे. गाडल्या गेलेल्या घरांमधून तब्बल 32 मृतदेह बाहेर काढले आहेत तर अद्यापही 80 ते 90 मृतदेह ढिगार्‍याखाली दबले गेले असल्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
जखमींनी हेलीकॉप्टरच्या सहायाने बाहेर काढण्यात येत आहे. महाड सावित्री पुरातील नागरीकांना एका हेलीकॉप्टरच्या सहायाने बाहेर काढण्यात येते आहे.

नेत्यांनी घेतला आढावा
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार भरत गोगावले घटनास्थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी त्यांनी मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला.




घटनेचे अतीव दुःखः मुख्यमंत्री
दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, तळीयेत दरड कोसळल्यानंतर काही जणांना वाचवू शकलो. पण आता 30 ते 35 लोकं दुर्देवाने मृत्यूमुखी पडलेत. नागपुरातही अतिवृष्टी होतेय. महाबळेश्वरातही जोरदार पाऊस सुरू असून याआधी कधी पडला नाही तेवढा पाऊस पडतोय. सर्व मिळून संकटाला तोंड देत आहोत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !