भाजपाही मैदानात : आज दिल्लीत पहिली यादी जाहीर होणार !
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी रात्री अमेरिका आणि संयुक्त राष्ट्राचा दौरा करून परतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दिल्लीत पंतप्रधानांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत महाराष्ट्रातली सत्ताधारी भाजपा रविवारी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. राज्यात 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपाची नजर उत्तर महाराष्ट्रातील 47 जागांवर आहे. उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे दोन्ही विरोधी पक्षांची अडचण वाढलेली आहे.
उत्तर महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यात 47 जागा
उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत 288 विधानसभा जागांपैकी 47 जागा आहेत. ज्यात नंदुरबारमध्ये चार विधानसभा मतदारसंघ, धुळ्यात पाच विधानसभा मतदारसंघ, जळगावात 11 विधानसभा मतदारसंघ, नाशिकमध्ये 15 विधानसभा मतदारसं, तर अहमदनगरमध्ये 12 विधानसभा मतदारसंघ आहेत.