भाजपा उमेदवारांची पहिली यादी आज होणार जाहीर


पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्राध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक : युती घोषणेची आज शक्यता

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्राध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत रविवारी सायंकाळी तब्बल साडेचार तास चाललेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकीत भाजपा उमेदवारांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले तर सोमवारी भाजपा आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, भाजपातर्फे लोकसभेप्रमाणेच काही विद्यमान आमदारांना विधानसभा निवडणुकीतही डच्चू दिला जाण्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून वर्तवली जात आहे तर दुसरीकडे चार जागांवर युतीचे घोडे अडल्याने एक वा दोन दिवसात युतीबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकीकडे युतीची चर्चा तर दुसरीकडे एबी फार्म वाटप
दोन दिवसात युतीची घोषणा होईल असं म्हणणार्‍या उद्धव ठाकरेंनी सांगितलेले युतीचे अनेक मुहूर्त टळले आहेत. मात्र युतीची घोषणा काही झाली नाही. आता शिवसेनेनं जवळपास 14 उमेदवारांना एबी फॉर्म वाटले आहेत तर भाजपची यादी जाहीर होताच तासाभरात उमेदवरांना एबी फॉर्म वाटले जाणार आहेत. भाजपनं विभागनिहाय संघटन मंत्र्यांकडे एबी फॉर्म सुपूर्द केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
ुतीच्या घोषणेआधी शिवसेनेनं संभाव्य यादी जाहीर करत एबी फॉर्म वाटल्यानंतर, आता कुठल्याही क्षणी भाजपची पहिली यादी जाहीर होणार आहे. तसंच यादी जाहीर होताच एका तासात उमेदवाराला एबी फॉर्म वाटले जाणार आहेत.

आज होणार भाजपाची यादी जाहीर
राज्यातील 6 विभागात 6 संघटन मंत्र्यांना एबी फॉर्म घेऊन जाण्याचा सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. संघटन मंत्री मुंबई – सुनील कर्जतकर, कोकण ठाणे – सतीश धोंडे, उत्तर महाराष्ट्र – किशोर काळकर, मराठवाडा – भाऊराव देशमुख, विदर्भ – उपेंद्र कोठेकर, पश्चिम महाराष्ट्र – रवींद्र अनासपुरे यांच्याकडे एबी फॉर्म दिले असल्याची माहिती आहे. यादी जाहीर होताच उमेदवारांना तासाभरात फॉर्म मिळावेत यासाठी भाजपने व्यवस्था केली आहे.


कॉपी करू नका.