जळगावात पोलिस कर्मचार्याची गळफास घेवून आत्महत्या
जळगाव : जळगाव पोलिस दलातील कर्मचार्याने राहत्या घरी पोलिस लाईनीत गळफास घेवून आत्महत्या केली. सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलिस कॉन्स्टेबल जयवंत दिलीप वाढे (32) असे मृत कर्मचार्याचे नाव आहे. आजाराने कंटाळून या कर्मचार्याने आत्महत्या केली असल्याचा संशय आहे. पोलिस लाईनीतील घर क्रमांक 272 मध्ये वाढे राहतात तर त्यांची नियुक्ती बॅण्ड पथकात असल्याचेही सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ, बहिण असा परीवार आहे.