विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाची अखेर युती


राज्यात प्रथमच पत्रकाद्वारे जाहीर झाला निर्णय : महायुतीत जागा वाटपाचा अद्याप अंतिम निर्णय नाही !

मुंबई : शिवसेना-भाजपा युतीचे जागा वाटपावरून घोडे अडल्यानंतर सोमवारी रात्री शिवसेना-भाजपा-रीपाइं-रासप-शिवसंग्राम-रयतक्रांतीची महायुती जाहीर करण्यात आली तर राज्यात प्रथमच युतीची पत्रकाद्वारे घोषणा करण्यात आली. या पत्रकावर उद्योग मंत्री सुभाष देसाई व महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांची स्वाक्षरी आहे. दरम्यान, जागा वाटपाचे घोडे अद्याप अडले असल्याने जागांबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे तर दुसरीकडे बंडखोरीच्या भीतीने जागा जाहीर केल्या नसाव्यात, अशीदेखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

जागांचा तपशील लवकरच जाहीर करणार
महसूलमंत्री पाटील व उद्योग मंत्री देसाई यांच्या स्वाक्षरीने जाहीर झालेल्या पत्राच्या आशयानुसार पाच वर्ष यशस्वी राज्य कारभार करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात महायुतीला सामोरे जात असल्याचे पत्रात नमूद आहे. मित्र पक्षांचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महायुती आगामी निवडणूक लढवणार असून महायुतीत कोणता पक्षा, कोणती व किती जागा लढवणार याचा तपशील जाहीर कला जाणार असल्याचे ही पत्रात नमूद आहे.

बंडखोरीच्या भीतीने जागा जाहीर नाही !
सूत्रांच्या माहितीनुसार बंडखोरीच्या भीतीने महायुतीत कुणाच्या वाट्याला किती जागा मिळाल्या हे जाहीर करण्यात आले नाही तर बंडोबांना आधी थंडोबा केल्यानंतर हा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपानंतर शिवसेनेला बंडखोरांचा फटका बसू शकतो, असे राजकीय विश्‍लेषकांना वाटते.

मातोश्रीवर महत्वपूर्ण बैठक
महायुतीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर सोमवारी रात्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठकीला सुरुवात झाली आहे.

(अपडेट माहितीसाठी लिंक रीफे्रश करत रहा)


कॉपी करू नका.