आमदार हरीभाऊ जावळे उद्या भरणार उमेदवारी अर्ज


मानाचा पाराचा गणपतीच्या आरतीनंतर रावेर तहसीलमध्ये शक्तीप्रदर्शनानंतर अर्ज होणार दाखल

रावेर : केळी संशोधन परीषदेचे उपाध्यक्ष व आमदार हरीभाऊ जावळे हे मंगळवार, 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहे. तत्पूर्वी मानाचा पाराचा गणपती, रावेर येथे त्यांच्या हस्ते आरती होईल व त्यानंतर तहसील कार्यालय रावेर येथे उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद शिक्षण आणि आरोग्य सभापती सुरेश झनके यांनी दिली.

शक्तीप्रदर्शनाद्वारे अर्ज होणार दाखल
उमेदवारी अर्ज दाखल करतांना जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, माजी महसूलमंत्रभ मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, बेटी पढाव चे संयोजक डॉ.राजेंद्र फडके, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री किशोर काळकर, भाजप जिल्हाध्यक्ष संजीव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रा.डॉ..सुनील नेवे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, ज्येष्ठ नेते सुरेश धनके, हिरालाल चौधरी, मसाका चेअरमन शरद महाजन, संचालक नरेंद्र नारखेडे, व्हा.चेअरमन भागवत पाटील, हरीश गणवानी, शिवसेना जिल्हा उप प्रमुख प्रल्हाद महाजन, तालुकाध्यक्ष योगीराज पाटील, सुरेखा कोळी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील, तालुकाध्यक्ष रवी सोनवणे, रीपाइं जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर, तालुकाध्यक्ष गणेश पवार, तालुकाध्यक्ष अरुण गजरे, रासप जिल्हा अध्यक्ष रवींद्र पवार, रावेर पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, यावल पंचायत समिी सभापती पल्लवी चौधरी आदींची उपस्थिती राहणार आहे.

उपस्थितीचे आवाहन
अर्ज भरताना महायुतीचे सर्व जिल्हा परीषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व आघाडी अध्यक्ष, सदस्य, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पेज प्रमुख, शक्ती केंद्र, बुथ प्रमुख, कार्यकर्ते आणि महायुतीचे सर्व मित्र पक्ष व हरीभाऊ जावळे यांच्यावर प्रेम करणार्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन जळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष पद्माकर महाजन, डॉ.मिलिंद वायकोळे, रावेर भाजप तालुका अध्यक्ष सुनील पाटील, यावल तालुकाध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे, रावेर भाजप सरचिटणीस वासुदेव नरवाडे, महेश चौधरी, यावल भाजप सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंह राजपूत यांनी केले आहे.


कॉपी करू नका.