दिराशी प्रेम जुळले… पतीला खबर लागताच जोडप्याने उचलले टोकाचे पाऊल


पाटणा : दिराशी प्रेमसंबंध जुळल्याची कुणकुण पतीला लागल्यानंतर पती-पत्नीत टोकाचा वाद झाला मात्र दिरासोबतच जीवन जगायचे म्हणून विवाहिता घराबाहेर पडली, दोघे दिड महिना सोबत राहिले मात्र एकत्र राहणे अशक्य ठरू लागल्याने दोघांनी विषप्राशन केल्याने प्रियकर असलेल्या दिराचा मृत्यू ओढवला तर महिला विवाहिता मृत्यूशी लढा देत आहे.
या घटनेत कुंदन कुमार याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्याच्या वहिनीची प्रकृती गंभीर आहे.

पती गावी गेल्यानंतर वाढली जवळीक
हरनौत येथील चक जेनाब गावातील बिंदेश्वरी यादव यांचा पुत्र राकेश कुमार याचा विवाह एक वर्षापूर्वी रहुईमधील अम्बा गावातील रहिवासी शबनम कुमारी हिच्याशी झाला होता. विवाहानंतर शबनमचा पती जेव्हा दिल्लीला गेला तेव्हा तिच्यात आणि तिच्या दिरामध्ये जवळीक निर्माण झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यातूनच ते घर सोडून पळून गेले.
दीड महिन्यांपूर्वी गाव सोडून गेलेले हे युगुल काही दिवसांपूर्वी हरनौत येथील रेल्वे स्टेशनवर परत आले. तिथे त्यांनी एकत्रच विषप्राशन केले. त्यात कुंदन याचा मृत्यू झाला. तर त्याची वहिनी असलेल्या या महिलेची प्रकृती गंभीर आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !