भुसावळातील रेल्वेतील लाचखोर मंडळ अभियंत्यांसह ओएसला 20 पर्यंत सीबीआय कोठडी
भुसावळ : मंजूर झालेल्या दोन निविदांची वर्क ऑर्डर (स्वीकृतीपत्र) देण्यासाठी दोन लाख 40 हजारांची लाच स्वीकारताना भुसावळ रेल्वे डीआरएम कार्यालयातील मंडळ अभियंता (विशेष कार्य, वर्ग- 1) एम.एल.गुप्ता व अभियांत्रिकी विभागातील कार्यालय अधीक्षक संजय रडे (ओ.एस.) यांना दोन लाख 40 हजारांची लाच कार्यालयातच स्वीकारताना नागपूर सीबीआयच्या पथकाने सोमवार, 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास डीआरएम कार्यालयातील दालनातच अटक केली होती. संशयीत आरोपींना मंगळवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यांना 20 पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.
हे पण वाचा- भुसावळातील रेल्वेतील लाचखोर मंडळ अभियंत्यांच्या घरात सापडले 15 लाखांचे घबाड



मलकापूरच्या कंत्राटदाराची सीबीआयकडे तक्रार
मलकापूर येथील एमएनवाय कन्सल्टिंग प्रा.लि. कंपनीने विविध कामासंदर्भात तीन निविदा भरल्या होत्या. त्यातील एक निविदा रद्द झाली मात्र दोन निविदा सर्वात कमी दराची (लोवेस्ट) असल्याने त्या मंजूर ऑनलाईन करण्यात आल्या होत्या. मंजूर निविदांची वर्कऑर्डर देण्यासाठी संशयीत आरोपी गुप्ता यांनी चार लाख तर संजय रडे यांनी 40 हजारांची लाच मागितल्याने नागपूर सीबीआयकडे तक्रार करण्यात आली होती. काम होण्यापूर्वी दोन लाख व वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर गुप्ता यांनी दोन लाखांची मागणी केली होती.

