भुसावळात चाकूच्या धाकावर दिव्यांग युवतीवर अत्याचार


भुसावळ : शहरातील नवीन ईदगाहजवळ 17 वर्षीय दिव्यांग अल्पवयीन युवतीवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल झाला. मटण मार्केटजवळील रहिवासी असलेल्या 17 वर्षाच्या युवतीला तिच्या राहत्या घरात चाकूचा धाक दाखवून 21 सप्टेंबर रोजी रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी आमिनने मोबाईलवर अश्लील सिनेमा दाखवून आणि चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !