मुंबईतील व्यापार्‍यास मारहाण करून लुटणारे संशयीत पोलिसांच्या नजरेत


भुसावळ : स्वस्तात भंगार देण्याच्या बहाण्याने मुंबईच्या व्यापार्‍याला भुसावळात बोलावून नंतर मुक्ताईनगरच्या जंगलात नेत मारहाण करून लुट करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केल्यानंतर गुन्हा करणारे हे संशयीत मुक्ताईनगर तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. लवकरच आरोपींना अटक करणार असल्याचा आशावाद पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी व्यक्त केला.
भाईंदर येथील व्यापारी संदीप प्रभूलाल वाणीगोटा व त्यांचे साडू दिनेशकुमार चंपालाल जैन हे मुंबई येथून भुसावळ येथे शनिवार, 14 ऑगस्टला रेल्वेने आल्यानंतर संशयीतांनी त्यांच्यासाठी चारचाकी पाठवत फॅक्टरी ोते. कुर्‍हाकाकोडा येथे असल्याचे सांगत कुर्‍हाकाकोडा भागात जंगलात नेत दुचाकीवरून आलेल्या 10 ते 15 संशयीतांनी वाणी गोटा व जैन यांना मारहण करून त्याच्ंयाजवळील रोख रक्कमेसह तीन लाख 77 हजार रूपयांचा
ऐवज लुटून पोबारा केला होता. दोन्ही व्यापार्‍यांना लूटणारे भामटे बलवीर, विक्रम, शरीफ यांच्यासह 10 ते 15 संशयीत हे मुक्ताईनगर तालुक्यातील असून त्यांची नावे पोलिसांना प्राप्त झाली असून संशयीत पसार असलेतरी लवकरच त्यांच्या मुसक्या आवळू, असे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व निरीक्षक दिलीप भागवत यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !