बिग ब्रेकींग : बेताल वक्तव्य भोवले : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेले प्रक्षोभक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलेच भोवले असून त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली असून राज्यात या कारवाईने प्रचंड खळबळ उडाली आहे.

न्यायालयाकडूनही मिळाला नाही दिलासा
या प्रकरणात नारायण राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी रत्नागिरी कोर्टात दाखल केलेला अर्ज कोर्टाने फेटाळून लावल्याने राणे यांच्यावरील अटकेची कारवाई अटळ होती. राणे यांनी रत्नागिरी कोर्टाच्या निकालाविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती मात्र लागलीच सुनावणी करण्यास हायकोर्टाने नकार दिला.




बेताल वक्तव्य भोवले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रायगडमध्ये नारायण राणेंनी हे चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती. नारायण राणेंच्या विरोधात कलम 500, 502, 505, 153 (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी राणेंच्या अटकेचे आदेश काढले होते.

हे पण वाचा : नारायण राणेंचे संतुलन बिघडले : शॉक ट्रीटमेंटची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !