नारायण राणेंचे संतुलन बिघडले : शॉक ट्रीटमेंटची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अटकेचे समर्थन करीत पोलिसांनी चांगले काम केले असल्याची प्रतिक्रिया एका वाहिनीची बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले की, एका माणसामुळे संपूर्ण महाराष्ट वेठीस धरला गेला असून देवेंद्रजींचे महत्व कमी करण्यासाठी राणेंचा भाजपात प्रवेश घडवण्यात आल्याचे ते म्हणाले. राणेंचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना ठाण्यात नेवून शॉक देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री आमचे दैवत असून त्यांच्या प्रतिमेला धक्का लावल्यास शिवसैनिक गप्प बसणार नाही, असा इशारादेखील त्यांनी देत बोलताना तारतम्य बाळगायला हवे होते, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्याविषयी बेताल वक्तव्य करण्यात आल्यानंतर त्या पदाची गरीमा राखण्यासाठी पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच असून मुख्यमंत्री एका पक्षाचे नसून 12 कोटी जनतेचे आहेत, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

