भुसावळात खाजगी वायरमनची आत्महत्या


भुसावळ : व्यवसायाने खाजगी वायरमन असलेल्या महेश नारायण पाटील (29, पंढरीनाथ नगर, भुसावळ) यांनी राहत्या सर्व्हिस वायर पंख्याला गुंडाळून गळफास केल्याची घटना बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येच कारण कळू शकले नाही. पंढरीनाथ नगरातील पूजा कॉम्प्लेक्सच्या मागील रहिवासी असलेल्या महेश पाटील यांनी आत्महत्या केली. घटनेची माहिती कळताच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहा.फौजदार इरफान काझी, महेश चौधरी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृताचे मामा योगेश पांडव यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार काझी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !