भुसावळात भाजपचा रस्ता रोको
भुसावळ : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ शहर भाजपने यावल रोडवरील गांधी पुतळ्याजवळ मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले. राज्य शासनाच्या विरोधात निषेध नोंदवत निदर्शने करीत शासनाचा धिक्कार करण्यात आला. या आंदोलनामुळे 10 मिनिटे यावल रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली. यावेळी शासनाच्या विरोधात निदर्शने देण्यात आली. यावेळी भाजप शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, प्रमोद सावकारे, जिल्हा उपाध्य9क्ष अजय भोळे, राजेंद्र आवटे, सतीश सपकाळे, अजय नागराणी, रमाशंकर दुबे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी, लक्ष्मणराव सोयंके, राजू खरारे, संदीप सुरवाडे, विशाल जंगले, शंकर शेळके, कैलास शेलोडे, सुरेश कुटे, नारायण रणधीर, जयंत जंगले, राहूल तायडे, विकास सपकाळे, भालचंद्र पाटील, दिलीप कोळी, अर्जून खरारे, चेतन बोरोले, नंदकिशोर बडगुजर, श्रेयल इंगळे, अर्थव पांडे, राहूल मेहराणी, सागर महाजन, वरुण पाटील, प्रशांत भट, कल्पेश महाजन आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.





