आपले मानवाधिकार फाऊंडेशनतर्फे रणजितसिंह राजपूत यांचा सत्कार


भुसावळ : संस्कृती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह राजपूत यांना दिल्ली येथील कार्यक्रमात केंद्रीय युवक व क्रीडा मंत्रालयाचा अत्यंत प्रतिष्ठेचा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारानंतर राजपूत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना आपले मानवाधिकार फाऊंडेशनतर्फे रणजितसिंह राजपूत यांचा सत्कार करण्यात आला.

यांची कार्यक्रमप्रसंगी उपस्थिती
राजपूत यांची स्वच्छ भारत अभियानांतर्गत भुसावळचे स्वच्छता राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली तसेच संस्कृती फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विविध समाजोपयोगी उपक्रम देखील राबविले आहेत. याच कार्याची दखल घेऊन आपले मानवाधिकार फाउंडेशनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आपले मानवाधिकार फाऊंडेशनचे संचालक डॉ.दीपेश पष्टे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष मयूर राजेंद्र अंजाळेकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश यावलकर, सचिन युवराज महाजन, प्रथमेश बाणाईत आदी सदस्य उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !