रावेरात विधीमंडळ समितीची धास्ती ; माहिती देण्यास टाळाटाळ


विधी मंडळ समितीने रावेरला भेट देण्याची गरज

रावेर : रावेर कृषी अधिकारी यांनी जिल्ह्यात आलेल्या विधी मंडळ समितीची प्रचंड धास्ती घेतली असून झालेल्या कामांची माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विधी मंडळ समिती मुक्कामी असून समिती विविध विभागांच्या योजनेची माहिती घेत आहे. रावेर तालुक्यातदेखील सुमारे 12 कोटी रुपयांची जलयुक्त शिवारची योजनेची कामे झाली आहेत. या कामांमध्ये भ्रष्टााचार झाल्याची ओरड असून याची माहिती येथील कृषी अधिकारी मयूर भामरे यांना मागितली असता माहिती त्यांनी ती देण्यास टाळाटाळ केली. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात विधीमंडळ अंदाज समिती आली आहे. विविध विभागाच्या योजनांचा समितीत आलेले सदस्य आढावा घेणार आहे. सर्वसाधारण जनतेपर्यंत शासनाच्या योजनांचा आढावा कोरोना काळात किती खर्च केला याचा आढावा घेण्याची शक्यता आहे. यासाठी तालुका प्रशासनाने जोरदार तयारी केली असून स्टेशन रोडवर असलेले मराठा मंगल कार्यालयच आढावासाठी बुक केले आहे. सकाळपासून बुधवारी सर्व कार्यालयात वेळे-आधी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

विधी मंडळ समितीने रावेरला भेट द्यावी
विधी मंडळ समितीने रावेर तालुक्याला भेट द्यावी व विविध योजनांची माहिती घ्यावी तसेच पीएम किसान योजना, उभारी योजना, शेततळे योजना, शेतकर्‍यांच्या ठिबक अनुदान पडताळणीचा आढावा विधी मंडळ समितीने घ्यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !