वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेच्या नाशिक झोन अध्यक्षपदी विलास सपकाळे


दीपनगर : वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेची नुकतीच निंभोरा बुद्रुक येथे प्रदेश कार्यकारणीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी माजी मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर होते. बैठकीत महापारेषण कंपनी मर्यादीत नाशिक झोनच्या अध्यक्षपदी विलास सपकाळे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश सरदार यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

वंचित कंत्राटदाराला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
नियुक्तीनंतर सपकाळे म्हणाले की, नाशिक झोनमध्ये वंचित बहुजन संघटनेतर्फे प्रत्येक वंचित कंत्राटदाराला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल त्याचप्रमाणे जिल्ह्यात संघटन मजबूत करण्याची गाव्ही त्यांनी दिली. प्रमुख उपस्थितांमध्ये जळगाव झोन अध्यक्ष शेख शब्बीर, केंद्रीय पदाधिकारी उपाध्यक्ष मन्साराम कोळी, सचिव प्रकाश तायडे, सहसचिव नारायण झटके, कोषाध्यक्ष संतोष तेलंग, संघटक उस्मानखान पठाण, तौसीफखान पठाण उपस्थित होते. दीपनगर शाखाध्यक्ष राजगोपाल तेलंग, सुरेश टाक, संजय अडकमोल, रवींद्र सरदार, संजय रावलकर, संदीप पाटील, सुरेंद्रसिंग ठाकुर, विलास राजपूत, भैय्या महाजन, सुरेश सरोदे, राजु मेश्राम आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन रंगराव आव्हाड तर आभार संघटनेचे सचिव प्रकाश तायडे यांनी मानले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !