श्री मनुदेवीच्या दर्शनाहून परतणार्या भाविकांच्या वाहनाला अपघात : आठ भाविक जखमी
यावल : श्री मनुदेवी मातेचे दर्शन करून परतणार्या भाविकांच्या रीक्षेला अपघात होऊन सहा महिलांसह मुलगा, मुलगी मिळून आठ भाविक जखमी झाले. शुक्रवार, 27 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मनुदेवी मंदिर ते आडगावच्या दरम्यान एका वळणावर हा अपघात झाला. जखमींमध्ये अरुणा मदन सपकाळे (45, खडका), लक्ष्मी प्रभाकर सपकाळे, (42, खडका), सुनीता महादेव पटोळे, गायत्री महादेव पटोळे , ऋषीकेश महादेव पटोळे (सर्व राहणार किन्ही, ता.भुसावळ) आदी जखमी झाले. जखमींना तत्काळ रुग्णवाहीकेव्दारे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. ा ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम तिडके यांनी आपल्या आरोग्य कर्मचार्याच्या मदतीने प्रथमपचार केले. यातील एक महीलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले. वढोदे गावाचे सरपंच संदीप सोनवणे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी जखमींना रूग्णालयात पोहचवण्यासाठी मदत केली.




