रावेर तालुक्यात पाच वर्षांपासून 627 घरकुलांचे काम अपूर्ण


रावेर : तालुक्यात 2016 पासून आतापर्यंत 627 विविध योजनेतील घरकुले अपूर्ण आहे. घरकुलांसाठी मुबलक निधी उपलब्ध असतांनादेखील घरकुले पूर्ण होण्यात ढिलाई होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. रावेर तालुक्यासाठी 2016 पासून चार हजार 348 घरकुले मंजूर असून त्यापैकी तीन हजार 741 घरकुले विविध योजनेचे पूर्ण झाले आहेत तर 627 घरकुले अपूर्ण आहे. गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी लक्ष घालण्याची गरज असून अपूर्ण घरकुलांमध्ये 2016 ची घरकुलेदेखील आहेत.

घरकुलांची अशी आहे स्थिती
रावेर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी घरकुल योजनेचे लाभार्थी असून 2016 पासुन मंजूर असलेले चार हजार 348 घरकुले मंजूर होते. त्यापैकी तीन हजार 741 घरकुले मंजूर असून 627 घरकुले अद्याप अपूर्ण स्थितीत आहेत. विशेष म्हणजे यात 2016 पासुनचे घरकुले असल्याने ते पूर्ण करण्यात पंचायत समिती कडून ढिलाई होत असल्याचा आरोप आहे.




लाभार्थींना ग्रामसेवकांकडून नोटीस मिळणार
2016 पासुन विविध योजनेत प्रलंबित असणार्‍या घरकूल लाभार्थींना ग्रामसेवकांकडून नोटीसा दिल्या जातील व लवकरच अपूर्ण घरकुले पूर्ण केले जाणार असल्याचे गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !