आंदोलनानंतर सरसावले प्रशासन : डॉ.विवेक सोनवणे यांच्या मागण्या मान्य
मुक्ताईनगर : तालुक्यातील नायगाव येथे डॉ.विवेक सोनवणे व बहुजन मुक्ती पार्टीने शुक्रवारी सकाळी विविध मागण्यांसाठी दफनविधी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रत्यक्षात खड्डेही खोदून आंदोलन सुरू केल्यानंतर प्रशासनातील अधिकार्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी डॉ.सोनवणे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या मागण्यांसाठी आंदोलन
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून जळगाव जिल्ह्यातील जवळपास तीस हजार शेतकरी वंचित असून त्यांना न्याय मिळावा, गतवर्षी केळीवर सी.एम.व्ही.नावाचा व्हायरस आल्याने त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांचे अरबो रुपयांचे नुकसान झाले शिवाय मे महिन्यात चक्रीवादळ झाल्याने केळी उत्पादकांना मोठा फटका बसल्याने दोन्ही नुकसानीची भरपाई मिळावी आदी मागण्यांसाठी नायगाव येथे शुक्रवारी सुकाळी डॉ.विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वात दफनविधी आंदोलन झाले.



प्रशासनाने केल्या मागण्या मान्य
मुक्ताईनगरचे नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, वानखेडे, यांनी लेखी आश्वासन देऊन तत्काळ सर्व मागण्या मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आंदोलनकर्ते डॉ.विवेक सोनवणे, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रमोद सोंदळे, ब्रिजलाल इंगळे तसेच मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस उपनिरीक्षक निलेश साळूंके, तालुका कृषी अधिकारी माळी, गोपनीयचे गणेश मनुरे, मंगल साळुंके, पत्रकार हेमंत पाटील, विठ्ठल धनगर, शकिर शेख, पंकज पाटील, शेतकरी सुरेश पाटील, शैलेश पाटील, कमील रौफ, गौतम प्रधान, संजय बुवा, सचिन चौधरी, एकनाथ पाटील, एन. टी.महाजन, विवेक पोहेकर, उल्हास पाटील, पवन वानखेडे, मुकेश तायडे, किशोर महाजन, राम सोनार, वैभव पाटील, शांताराम बेलदार, रघुनाथ पोहेकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

