भाजयुमोच्या आंदोलनानंतर कमी केलेल्या कर्मचार्‍यांना कामावर घेण्याचे आदेश


खासदार रक्षा खडसेंसह आमदार संजय सावकारेंची अधिकार्‍यांशी यशस्वी चर्चा

दीपनगर : दीपनगर प्रकल्पातून स्थानिक कंत्राटी कर्मचार्‍यांना राजकीय दबावापोटी काहीही कारण न देता कमी करण्यात आल्यामुळे शुक्रवारी सकाळी भारतीय जनता युवा मोर्चा वरणगावच्या आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांनी भेट देऊन 660 मेगावॅट प्रकल्पाचे सी.जी.एम रोकडे व 500 मेगावॅटचे सी.जी.एम राठोड यांच्याशी चर्चा केली. यावेळी कामावरून कमी करण्यात आलेल्यांना दोन दिवसांच्या आत कामावर घेण्याबाबत चर्चा केल्यानंतर अधिकार्‍यांनी दोन दिवसात कर्मचार्‍यांना कामावर घेण्याचे आश्‍वासन दिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !