भुसावळातील रानातला महादेव मंदिराच्या नावाने देणगी न देण्याचे आवाहन
भुसावळ : शहरातील शिवशक्ती हुडको कॉलनी परीसरातील रानातील महादेव मंदिर जुन्या काळातील जागृत देवस्थान आहे. या मंदिराच्या नावाने काहींकडून देणगी मागितल्याचे प्रकार सुरू आहेत मात्र श्रावण महिन्यात महाशिवरात्रीच्या वेळी या मंदिरात धार्मिक कार्यक्रम होतात व या कार्यक्रमांसाठी बाहेर कुठेही देणग्या किंवा धान्य मागितले जात नाही त्यामुळे कुणीही पैसे वा धान्य देवू नये, असे आवाहन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या संदर्भात कुणी पैसे मागत असल्याची तातडभने महेश देविदास फालक, मंगेश सुभाष पाटील (9579545626), अतुल गुरव पुजारी (7498800627) यांच्याशी संपर्क साधाव, असे आवाहन करण्यात आले आहे.





