सकल लेवा पाटीदार समाजातर्फे वधू-वर नोंदणीसाठी आवाहन


भुसावळ : सकल लेवा पाटीदार समाजातील जळगाव, भुसावळ, औरंगाबाद येथील समाजमंडळाचा संयुक्त उपक्रम वधू-वर परीरचय सूचीसाठी नाव नोंदणीबाबत आवाहन करण्यात आलेआहे. लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छूक युवक-युवतीचे परीचय सूचीत नाव नोंदणी सुरू झाली असून या परीचय सूचीत युवक-युवतींची शैक्षणीक, कौटुंबिक माहिती संकलित करण्याचे काम विविध नोंदणी केंद्रावर सुरू करण्यात आले आहे शिवाय परीचय फार्मसाठी निसर्ग प्लाझा, भुसावळ व भोरगाव पंचायतीचे कार्यालय, जामनेर रोड, भुसावळ तसेच ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी http://sakallevapatidar.org, http://levayuva.com वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन लेवा पाटीदार युवक महासंघाचे अध्यक्ष प्रकाशराव पाटील, उपाध्यक्ष राजेश सुधाकर चौधरी, शहराध्यक्ष देवा वाणी यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !