उसनवारीच्या पैशातून वाद : डोक्यात कुर्‍हाड टाकल्याने एक जण जखमी


चाळीसगाव : तालुक्यातील तळोंदे येथे उसनवारीचे पैसे घराजवळ येऊन मागितल्याच्या कारणावरून एकाच्या डोक्यात कुर्‍हाड टाकण्यात आली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमा नरसिंह चव्हाण (रा. तळोंदे)यांनी गेल्या पाच वर्षांपूर्वी गावातील एकाला 30 हजार रुपये उसवारीने दिले होते. दरम्यान सोमा हा पैसे मागण्यासाठी गेला असता आरोपीने माझ्या घराजवळ येऊन पैसे मांगत असल्याच्या कारणावरून शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यावर भाऊ बाजीराव नरसिंह चव्हाण यांनी मध्यस्थी केली असता आरोपीने लोखंडी कुर्‍हाडीने त्यांच्या डोक्यात मारहाण करून जबर दुखापत केली. ही घटना शनिवार, 28 रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली असून औषधोपचाराकामी बाजीराव नरसिंह चव्हाण यांना चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रकृतीत थोड्या प्रमाणात सुधारणा झाल्याने त्यांच्या जाब जबाबावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि रमेश चव्हाण हे करीत आहेत.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !