भुसावळात एस.टी.कामगारांची नियमित पगारासाठी निदर्शने


भुसावळ : एस.टी.कर्मचार्‍यांना नियमित पगार मिळावेत या मागणीसाठी भुसावळ बसस्थानकात सोमवारी दुपारी संघर्ष एस.टी.कामगार युनियनतर्फे निदर्शने करण्यात आली. 500 कोटी मदतीची घोषणा नको मात्र नियमित वेतन देण्याची जवाबदारी घ्या, औद्योगिक न्यायालयाचे आदेश अंमलात आणा, जुलै 2021 चे वेतन त्वरीत द्या, अशी घोषणाबाजी प्रसंगी कर्मचार्‍यांनी केली. विविध मागण्यांबाबत कर्मचार्‍यांनी यावेळी फलक झळकावले. या निदर्शन आंदोलनात संघर्ष एस.टी.कामगार युनियनचे अध्यक्ष राजेंद्र गणपत बारी, कार्याध्यक्ष विनोद अरुण वराडे, सचिव संदीप माधव वराडे, खजिनदार रामेश्‍वर बाबूराव फुसे, सदस्य के.एस.ठोसर यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !