भुसावळात राज्यस्तरीय बॉक्सींग स्पर्धा


भुसावळ : बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने रविवार, 29 ऑगस्ट रोजी स्वर्गीय ध्यानचंदजी यांच्या जन्मदिवसा निमित्ताने तालुका राज्यस्तरीय पुरुष/महिला यांच्या बॉक्सिंग स्पर्धा कॅसीओस स्पोर्ट्स अकॅडमी, कंडारीतर्फे आयोजन करण्यात आले. स्व.ध्यानचंदजी यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत भुसावळ तालुक्यातील सर्व बॉक्सिंग क्लबने भाग घेतला. या स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव विजय सोनवणे यांच्याद्वारे अनुमती देण्यात आली. या आयोजन कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल घोडेस्वार, सचिव सी.आर.गुप्ता, कोषाध्यक्ष सुनील नवगिरे, उपाध्यक्ष मनोज सूर्यवंशी, पवन शिरसाट, पीटर यांच्या द्वारे करण्यात आले. प्रवीण मोरे, अनिल तिवारी, मनीष, जीवन पाटील, अनिल, प्रकाश जाधव यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !