हल्ल्याचा निषेध : यावलमध्ये पालिका कर्मचार्यांची निदर्शने
यावल : ठाणे मनपाच्या महिला अधिकार्यांवर झालेल्या हल्ल्याचा यावल पालिका कर्मचार्यांनी निषेध करीत काम बंद आंदोलन केले तर प्रशासकिय कामकाज मात्र काळ्या फिती लावून करण्यात आले.हल्लेखोरावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणार्या एका महिला अधिकार्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक असून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावणार्या अधिकार्यांवर हल्ले करतात तेव्हा अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ अधिकार्याचेच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्चीकरण होते त्यामुळे अश्या प्रकारच्या हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे. या आंदोलनात कक्ष अधिक्षक विजय बढे, नितीन सुतार, शिवानंद कानडे, राजेंद्र गायकवाड, दादु धोत्रे, रफीक अरब, असलउल्ला खान, मधुकर गजरे, मुकेश गजरे, नितीन पारधे, राजु गायकवाड, मोहन सोनार, सुनील उंबरकर, सचिन तायडे, अमोल शिंदे, राजश्री कोळी, गजानन महाजन, विशाल वानखेडे सह कर्मचारी सहभागी झाले.





