फैजपूरात रेस्टारंट फोडले : 24 हजारांची रोकड लंपास


फैजपूर : शहरातील सुभाष चौक पोलिस चौकी समोर असलेल्या धनजीशेठ रेस्टॉरंटमधून चोरट्यांनी 24 हजारांची रोकड लांबवली. मुख्य रहदारीने गजबजलेल्या सुभाष चौक, पोलीस चौकीसमोरील धनजीशेठ रेस्टॉरंटची रात्री कुलपे तोडून अज्ञात चोरट्यांनी 24 हजारांची रोकड लांबवल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली. रेस्टॉरंटचे मालक भरत चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री दुकानाची दोन्ही कुलूपे तुटलेली आढळली. गल्यात असलेली 23 ते 24 हजारांची रोख रक्कम चोरीला गेली. सुभाष चौकात चोहोबाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून व मुख्य रहदारीने गजबलेल्या भागात चोरी होणे तसेच शहरातील विंध्यानगर, बसस्थानक, शिवाजी नगर आदी भागात गेल्या काही दिवसांपासून चोर्‍या होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कारभाराविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !