फळ पीक विमा देण्यास दिरंगाई : सावद्यात बँक शाखा व्यवस्थापकांविरोधात अखेर गुन्हा दाखल


सावदा : जळगाव जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत शेतकर्‍यानां फळ पीक विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्‍या बँक शाखा व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. या अनुषागाने शुक्रवारी सावदा पोलिसात दोन शाखा व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
रावेर येथील प्रभारी कृषी अधिकारी मयूर भामरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. बँक ऑफ बडोदाचे तत्कालीन शाखा प्रबंधक राम रहिश यादव (कार्यकाळ 25/4/2019 ते 12/11/2020) व शाखा प्रबंधक गणेश तळेले (कार्यकाळ दि.13/11/2020 ते आज पावेतो बँक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीचा आशय असा की, 31 ऑक्टोबर 2019 ते 11 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये शासनाचे पुनर्रचीत हवामान आधारीत फळपिक विमा योजना (अंबिया बहार) कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्र. फवियो-2019/प्र. क्र.202/10-ऐ. दि.31/10/2019 अन्वये पारीत झालेल्या आदेशाचे पालन न केल्यामुळे जिल्हाधिकारी जळगाव (लोकसेवक) यांनी पारीत केलेले आदेश क्र.जाक्र./सां/फळपिक विमा/तक्रारी/1617/ 2021 जिअकृअ जळगाव दि.25/5/2021 अन्वये आदेशाची अवज्ञा करण्यात आला. राम रहिश यादव व गणेश तळेले यांच्या विरोधात भादंवि 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहा.निरीक्षक देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश पाटील हे करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !