‘एक बाळ, एक झाड’ : माऊली फाऊंडेशनचा उपक्रम
रावेर : शहरातील माऊली फाऊंडेशनतर्फे एक बाळ, एक झाड हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक बाळंतीणीची रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर घरी जाताना एक झाड देवून ते जगविण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचे कार्य माऊली फाऊंडेशनतर्फे केले जात आहे. या कार्यक्रमास प्रांताधिकारी कैलास कडलग, सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी तडवी, पोलीस निरीक्षक कैलास नागरे, वनक्षेत्रपाल मुकेश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यावरण र्हा सथांबवणे शक्य : नागरे
पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी सांगितले की, पर्यावरणाचा होणारा र्हास थांबवणे मनुष्याला शक्य आहे. जेव्हढ्या प्रमाणात वृक्ष संवर्धन होईल. तेवढ्यात प्रमाणात पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. डॉ. संदीप पाटील यांनी वृक्षसंवर्धन हा आपला आवडता विषय असल्याचे नमूद करत शासनातर्फे व खाजगी संस्थांतर्फे राबविण्यात येणाया वृक्ष संवर्धनाच्या कार्यक्रमांमध्ये आनंदाने सहभागी होत असल्याचे सांगितले. वृक्षांपासून मिळणारी फळे ही शरीरासाठी पोषक असतात. त्यापासून शरीराला विटॅमीन मिळते. एक ना अनेक लाभ झाडांमुळे मिळतात. त्यासाठी वृक्ष संवर्धन गरजेचे आहे. समाजोपयोगी काम आपल्या हातून घडल्याचे पुण्य ही आपल्याला लाभेल असेही ते म्हणाले.



वृक्ष संगोपनाचीही संधी
प्रसन्ना पोतदार या म्हणाल्या की, माऊली हॉस्पीटलतर्फे सुरू करण्यात आलेला उपक्रम हा स्तुत्य असून बाळासोबतच वृक्षाचेही संगोपन करण्याची संधीच जणू आम्हाला मिळाली आहे. कार्यक्रमात अंकिता प्रणय चौधरी (पिंप्रीनांदू), लक्ष्मी अमोल चौधरी (ऐनपूर), नाजमीन बी.शेख जहीर (रसलपूर), नयना मंगलेश पाटील (नरवेल), नयना गणेश नंबरदार (बोरसर म.प्र.), प्रसन्ना सुहास पोतदार (भुसावळ), रूपाली आशिष माळी (रावेर), फरजाना बी.शेख नासीर (भोर), संगीता संदीप भालेराव (ऐनपूर), पार्थ गोकूळ शिंदे (रावेर) यांना वेगवेगळ्या प्रकारची रोपे वृक्षभेट म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.सूत्रसंचलन गजाला तबस्सूम यांनी केले. कार्यक्रमास ललित पाटील, राजेश भंगाळे, दीपक नगरे, विजय पाटील, डॉ. एस.आर.पाटील, राजेश शिंदे, ईश्वर महाजन, राहुल पाटील, गौरव पाटील, योगेश कुलकर्णी, भूषण पाटील, नदीम शेख, जुबेर शेख यांच्यासह रूग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.


