दीपनगरात स्थानिकांना रोजगार न दिल्यास तीव्र आंदोलन


भुसावळातील पत्रकार परीषदेत खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांचा इशारा

भुसावळ : दीपनगर प्रकल्पात स्थानिक नागरीकांनी जमिनी दिल्यांतरही नवीन प्रकल्पात स्थानिक ऐवजी युपी-बिहारच्या मजुरांना काम दिले जात असून हा स्थानिकांवर अन्याय आहे. ही बाब केंद्र व राज्य शासनाला कळवली असून दीपनगरात स्थानिक अधिकार्‍यांशी या संदर्भात चर्चा करण्यात आली असून जोपर्यंत स्थानिकांना प्रकल्पात काम मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये, अशी भूमिका मांडल्याची माहिती खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांनी शनिवारी सायंकाळी भुसावळातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परीषदेत दिली.

युपी-बिहारातील 900 मजुरांना काम
या संदर्भात भूमिका मांडताना खासदार खडसे म्हणाल्या की, दीपनगरातील विविध प्रश्‍नांबाबत गेल्या दोन वर्षांपासून आमचे आंदोलन सुरू आहे. नवीन प्रकल्पातील युपी-बिहारातील तब्बल 900 मजुरांना काम देण्यात आल्याची बाब उघड झाली आहे तर केवळ 300 ते 400 स्थानिक वर्कर्स आजरोजी प्रकल्पात काम करीत आहेत. ही बाब गंभीर असून प्रकल्पास विरोध नाही मात्र स्थानिक बेरोजगारांना काम मिळावे, ही आमची भूमिका असल्याचे खासदार म्हणाल्या. केंद्र व राज्य सरकारला ही बाब कळवण्यात आली असून उर्जा मंत्र्यांशीही चर्चा केल्याचे त्या म्हणाल्या.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !