एकात्मिक बालविकास विभागातर्फे चिमुकल्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
भुसावळ : एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) भुसावळ यांच्यातर्फे, राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय पोषण माह राबविण्यात आला. एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) आर.एम.सिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली एस.ए.रेंगे यांनी गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली 0 ते 6 वर्ष मुलांच्या आहाराबाबत उपयुक्त माहिती दिली व मार्गदर्शन केले. यावेळी लहान मुलांना विविध फळांचे मुखवटे घालून स्पर्धा घेण्यात आल्या. या प्रसंगी सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





